आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय सुराणा यांची बिनविरोध निवड!


पुणे दि.४: सीनियर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांच्याकडे सोपवण्यात आली असून,त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.जयपाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीमध्ये ही अधिकृत घोषणा करण्यात आली.

पत्रकारांच्या विविध व्यावसायिक व व्यक्तिगत अडचणींना संघटितपणे वाचा फोडणे आणि पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करणे,तसेच ज्येष्ठ पत्रकारांचा समृद्ध अनुभव आणि नवोदित पत्रकारांमधील उत्स्फूर्त  ऊर्जा यांचा एकत्रित समन्वय साधत,संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे करणे.ही प्रमुख उद्दिष्टे व भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयपाल पाटील सरचिटणीस संजय जोशी, पुणे शहर अध्यक्ष मिलिंद वैद्य, सचिव चंद्रकांत कांबळे तसेच विविध नामांकित वृत्तपत्रांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी विजयराव सुराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.आणि त्यांच्या आगामी पत्रकार हिताच्या कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *