आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

तळेगाव दाभाडे येथील आयकॉनिक सोसायटी मध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न!


तळेगाव दाभाडे दि.५: दहीहंडी हा केवळ सण किंवा खेळ नसून तो महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला या पवित्र सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही तळेगाव दाभाडे येथील नामांकित सोसायटी आयकॉनिक येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळ गोपाळांच्या जल्लोषात आणि सोसायटीतील सभासदांच्या उपस्थितीत हा आनंद सोहळा जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

दहीहंडीसाठी आयोजकांनी केलेली आकर्षक सजावट आणि श्रीकृष्णाचा पेहराव परिधान केलेले बाळ-गोपाळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली दहीहंडी फोडण्यासाठी सोसायटीमधील लहान मुलां-मुलींच्या संघामध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.या दरम्यान आयोजकांनी मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले,व त्यांच्या देखरेखेखाली “गोविंदा रे गोपाळा” म्हणत सोसायटीमधील मुलींनी व मुलांनी दहीहंडी फोडली.हंडी फुटतात संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

ह्या सोहळ्यामुळे सोसायटीमधील एकोपा, आनंद आणि सणासुदीचे चैतन्य पाहायला मिळाले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि पारंपारिक संस्कृतीची ओळख करून देणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधाकृष्ण जावळे, प्रसाद जावळे, आदेश कालेकर, शामराव काळे, हिंदुराव शिंदे, बिपिन विश्वनाथन, नितीराज निकम, गोरख खापे,काळे काका आणि उपस्थित सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *