उद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेकडे मावळचे लक्ष पवना बंदिस्त जलवाहिनीवर राष्ट्रवादीची भूमिका आज स्पष्ट होणार!


वडगाव मावळ: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून गेल्या अनेक वर्षांपासून मावळच्या राजकारणात आणि शेतकरी वर्तुळात सुरू असलेली चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. आज २४ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकल्पाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला मावळ मधील शेतकरी आणि विविध संघटनांकडून सातत्याने विरोध होत आला आहे. २०११ मधील आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रकल्पाचा विषय मावळच्या राजकीय आणि सामाजिक स्मृतीत संवेदनशील राहिला आहे.दरम्यान २०२६ मध्ये प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला असून,  घरविस्तापित्यांचे पुनर्वसन आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही यामध्ये प्रस्तावक आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीशिवाय आमदार सुनील शेळके यांच्या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती भूमिका मांडतात,याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे.यापूर्वी २०२३ मध्ये शेळके यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नये अशी भूमिका मांडली होती.

आजच्या पत्रकार परिषदेत प्रकल्पाबाबत राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका, शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत पक्षाची दिशा आणि पुढील कृती कृतीचे संकेत मिळतात का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.पत्रकार परिषदेनंतर पवना जलवाहिनीच्या प्रस्तावाला कोणते नवे राजकीय वळण मिळते हे स्पष्ट होणार आहे.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *