उद्योगमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये श्लोक पठण स्पर्धा भक्तीमय वातावरणात संपन्न!


“श्लोक पठण स्पर्धा: सात्विक,चैतन्य, भव्य- दिव्य सोहळा आणि सांस्कृतिक वारशाचा श्रवणीय उत्सव उत्साहात संपन्न “

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सवाच्या पवित्र, चैतन्यमय पर्वात, भक्ती आणि संस्कृतीचा संगम साधणारा श्लोक पठण हा सांस्कृतिक कार्यक्रम तळेगावातील नामवंत सोसायटी नम्रता आयकॉनिक येथे अभूतपूर्व वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान प्रवाहात आपल्या प्राचीन संस्कृतीची, संस्कारांची आणि मूल्यांची मुळे बालमनावर रुजावी,हा उत्कट हेतू ठेवून या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

AI च्या या आधुनिक युगात जिथे बालपण स्क्रीन आणि गॅजेटच्या जगामध्ये हरवत चालले आहे,अशा काळातही आपल्या मुलांना आपली भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्लोक पठण याची आवड निर्माण करून देणे, ही अत्यंत भूषणावाह बाब आहे. यासाठी सर्व पालकांचे मनःपूर्वक कौतुक आहे.

या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक श्री.सागर महामुनी यांनी अत्यंत निष्पक्ष व सुंदर परीक्षण केले.त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना उच्चार,स्वर-लय आणि सादरीकरण यासंबंधी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या या अमूल्य  मार्गदर्शनामुळे सर्व स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला.

श्लोक पठण निकाल पुढीलप्रमाणे :

Jr.Sr Kg ‘अ’ गट

बिंद्रा कोणार-प्रथम क्रमांक

गार्गी पत्की-द्वितीय क्रमांक

स्पृहा जावळे-तृतीय क्रमांक

१ ते ४ ‘ब’ गट

लक्षिता मुळे-प्रथम क्रमांक

तन्वी शिंदे-द्वितीय क्रमांक

दुर्वा खडतरे-तृतीय क्रमांक

५ ते ९ ‘क’ गट

सर्वेश देशमुख-प्रथम क्रमांक

रुचिता लंके- द्वितीय क्रमांक

रिदिमा पाटील- तृतीय क्रमांक

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव कमिटी मधील श्री. मंदार पाटील, सौ.श्रुती शिंदे, सौ.अश्विनी नलावडे, श्री. विपिन व श्री जावळे काका यांनी विशेष परिश्रम घेतले.

पाहुण्यांचे स्वागत आणि सूत्रसंचालन सौ.पुनम निकम यांनी केले,तर आभार सौ.श्रुती शिंदे व सौ.अश्विनी नलावडे यांनी मानले.

गणेश उत्सवाचे औचित्य साधून सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या श्लोक पठण सोहळ्यामुळे,वातावरणात दिव्य ऊर्जा निर्माण झाली. स्पर्धकांच्या मुखातून उमटणाऱ्या वेद मंत्रांच्या आणि श्लोकांच्या पवित्र ध्वनीने संपूर्ण आसमंत सात्विक, पुण्यश्लोक,चैतन्यमय आणि पावन झाला.

 

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *