कामशेत शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश लालगुडे; नूतन कार्यकारणी जाहीर..
कामशेत: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या कामशेत शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुसगाव येथील जेष्ठ पत्रकार गणेश शिवराम लालगुडे यांची निवड करण्यात आली आहे. कामशेत येथे पार पडलेल्या बैठकीत परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा आणि मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर यांनी गणेश लालगुडे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा केली,ज्याला उपस्थित पत्रकारांनी एक मुखाने मंजुरी दिली.
पत्रकारितेच्या संघटनात्म मजबुतीसाठी आणि कामशेत शहर व परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांना प्रभाविपणे वाचा फोडण्यासाठी पत्रकार संघाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे :
अध्यक्ष -गणेश लालगुडे
उपाध्यक्ष-रमेश शिंदे(सारा न्यूजचे प्रतिनिधी)
सचिव -महेंद्र ओव्हाळ(संपादक-जागृत मावळ)
सक्रिय सदस्य -सलीम शेख, सचिन मोरे, संजय गायकवाड, विलास गायकवाड, सारिका लालगुडे आणि मंथन मोरे.
मान्यवर,पत्रकार उपस्थिती व सत्कार :
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस.एम जोशी यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत राज्याचे विश्वस्त शरद पाबळे, मावळ तालुका पत्रकार संघाच्या कार्याधक्षा रेखा भेगडे,सचिव महादेव वाघमारे, पत्रकार परिषद प्रमुख सुभाष भांडे, प्रकल्प प्रमुख दत्ता म्हाळसकर,ज्येष्ठ पत्रकार अमिन खान व विजय सुराणा, प्रा. ऋषिकेश लोंढे, मयूर सातपुते, अनिस शेख, विद्या अडसूळ, पूनम निकम, ऍड. संजय पाटील,सुनील म्हस्के, संतोष थिटे, मनोज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारितेचा विस्तार आणि भूमिका :
पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्यापूर्ती मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडताना, स्थानिक पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कामशेत शहर पत्रकार संघ कटिबद्ध राहील असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संपादक : पूनम निकम





