क्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

भंडारा डोंगर परिसरात अज्ञात मुलगी आढळली; पालकांचा शोध सुरू.


भंडारा डोंगरावर आढळली चिमुकली मुलगी;ओळख पटविण्याचे आवाहन.

तळेगाव दि.६: तळेगाव MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा डोंगर परिसरात रविवारी दि.६सप्टेंबर रोजी सुमारे दीड वर्षांची मुलगी सापडली आहे. डोंगरावरील आसपासच्या परिसरात तिच्या पालकांचा व नातेवाईकांचा शोध घेण्यात आला; मात्र ते आढळून न आल्याने पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

मंदिराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या बदामाच्या झाडाखाली ही मुलगी आढळून आली. तिचे वय अंदाजे दीड वर्षे असून वर्ण सावळा, केस व डोळे काळे, नाक सरळ आहे.उंची सुमारे दोन फूट असून,वजन अंदाजे १० किलो आहे.

मुलीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फ्रॉक असून त्यावर लाल, पिवळ्या व गुलाबी रंगांच्या रेषा आहेत. केस निळ्या रबर बँडने बांधले असून कपाळावर लाल टिकली लावलेली आहे. मुलीच्या हातात, गळ्यात, कानात, नाकात कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.

ह्या वर्णनाची मुलगी कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा तिच्या पालकांविषयी माहिती असल्यास तळेगाव MIDC पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क :

तळेगाव MIDC पोलीस ठाणे :८१०८८००३८१

पोलीस उपनिरीक्षक विशाल नवगिरे:७७५६०५०२६५

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *