आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांची बिनविरोध निवड!


वडगाव मावळ दि..३: “मावळ तालुक्यातील ज्येष्ठ अनुभवी पत्रकार,युवा माध्यमकर्मी आणि सक्षम महिला पत्रकार यांच्या एकजुटीमुळे पत्रकारितेला व तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नेहमीच ठामपणे उभी राहील.”असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख व विश्वस्त शरद पाबळे यांनी आज सदिच्छा भेट दिली.त्यावेळी ते बोलत होते.

संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या या विशेष बैठकीत ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांची तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार,तळेगाव दाभाडे आणि कामशेत येथील मराठी पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षांची निवड देखील जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमामध्ये शरद पाबळे यांनी परिषदेच्या मागील ८६ वर्षांतील देश पातळीवरील कार्याची आणि व्याप्तीची माहिती दिली.

पत्रकारांच्या मागण्या,समस्या आणि त्यांच्यावरील उपायांसाठी शासन दरबारी केलेला पाठपुरावा,यामुळे मराठी पत्रकारांचा आत्मविश्वास उंचावला असल्याचे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष अमिन खान यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीत महाराष्ट्र लाईव्ह 1चे मुख्य संपादक तथा मालक दत्ता माळसकर, दैनिक सकाळचे विजय सुराणा,सतर्क महाराष्ट्र चॅनलच्या मुख्य संपादक रेखा भेगडे,लोकमत 18 चे अनिस शेख,लोकमत उर्से प्रतिनिधी प्रा.योगेश घोडके, मावळटेक चॅनलचे प्रमुख मयूर सातपुते,मावळदर्पणचे संपादक गणेश भेगडे, मावळ वार्ताच्या प्रतिनिधी विद्या अडसूळ, डिजिटल वार्ताच्या मुख्य संपादक पूनम निकम यांचा समावेश आहे.

संघाचे अध्यक्ष सचिन ठाकूर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांनी प्रास्ताविकेतून तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. तर प्रा.योगेश घोडके यांनी चालू वर्षातील नियोजित कार्यक्रमांची व उपक्रमांची रूपरेषा मांडली.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *