आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

मावळ तालुका पत्रकार संघास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांची सदिच्छा भेट!


वडगाव मावळ दि.३: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी नुकतीच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या मावळ तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या महत्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांच्या विविध अडी-अडचणी,व्यवसायिक समस्या, डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने आणि संघाच्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत असून,पारंपारिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे.या डिजिटल प्रवाहात पत्रकारांसमोर अनेक नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत.या आव्हानांचा यशस्वी सामना करताना,पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत,डिजिटल पत्रकारिते उत्कटपणे सक्रिय सहभाग कसा नोंदवावा यावर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. केवळ बातमीदारी न करता, विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर कसा करावा,याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले.

पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक अडी-अडचणींच्या वेळी संघाने नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.संघटना ही केवळ नावापूर्ती किंवा कागदोपत्री नसावी.संघाच्या वतीने वर्षभरात ठरवण्यात येणारे वार्षिक कार्यक्रम आणि उपक्रम कागदावर न राहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी आणि ती पाहण्यासाठी मी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेट देईल अशी उत्कट ईच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मावळ तालुका पत्रकार संघ ज्या पद्धतीने सक्रियपणे आणि नियोजनबद्ध काम करत आहे,त्याबद्दल त्यांनी संघाच्या एकूण कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.ह्या भेटीमुळे मावळ तालुक्यातील पत्रकारांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून,भविष्यात पत्रकारितेचा स्तर उंचावण्यासाठी आणि पत्रकारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, ही भेट अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.

कार्यक्रमासाठी भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर, जेष्ठ पत्रकार आमिर खान व विजय सुराणा, रेखा भेगडे, ॲड. संजय पाटील,प्रा.महादेव वाघमारे,दत्तात्रय म्हाळसकर, प्रा. ऋषिकेश लोंढे,मयूर सातपुते, सुभाष भांडे, अनिश शेख, विद्या अडसूळ, सुनील म्हस्के, पूनम निकम, संतोष थिटे,मनोज मोरे, आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर यांनी केले, तर प्रा.योगेश घोडके यांनी संघाच्या वार्षिक कार्यक्रमांची आणि उपक्रमांची कार्यकारणी प्रस्तुत केली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांनी केले.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *