उद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

कास पठार फुलोत्सव प्रारंभ:पर्यटकांसाठी निसर्गाची जादू अनुभवण्याची सुवर्णसंधी!


सातारा: जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि फुलांचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित फुलोत्सवास एक सप्टेंबर पासून दिमाखात प्रारंभ झाला आहे. पावसाळ्याच्या अखेरीस आणि शरद ऋतुच्या आगमनावर पठारावर फुलणाऱ्या दुर्मिळ वन्य फुलांची चादर पसरण्यास सुरुवात झाली असून, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे पर्व म्हणजे नयनदीप्य आणि अलौकिक पर्वणी ठरणार आहे.

कास पठारावर दरवर्षी ऑगस्ट,ऑक्टोबर दरम्यान पांढऱ्या, पिवळ्या,जांभळ्या आणि गुलाबी रंगांच्या विविध नैसर्गिक रानफुलांची उदाहरण पाहायला मिळतात. सीतेचे आसवे, चोहोकी,गेंद, आभाळी कंदील पुष्प, कुमुदिनी फुलांचा बहर, तेरडा आणि नभाळी यांसारख्या स्थानिक व दुर्मिळ प्रजातींची फुले पठारावरचे सौंदर्य द्विगुणीत करत आहेत. यंदाच्या हंगामात वेळेवर सुरू झालेल्या पावसामुळे फुले उगवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले,असून पर्यटकांना  ह्या फुलांच्या अथांग गालीच्याचे विहंगम दर्शन घडणार आहे.

पर्यटकांसाठी प्रशासनाच महत्त्वाचे नियम व सुविधा: 

१)ऑनलाइन नोंदणी: पर्यटकांची होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी www.kas.org.in या अधिकृत संकेतस्थळावरून पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. दररोज केवळ ३ हजार पर्यटकांनाच ऑनलाईन प्रवेश दिला जाणार आहे. शनिवार, रविवार तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार असून,थेट येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. बारा वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रति व्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित केले आहे.

२)वाहन व्यवस्था: पठाराच्या मुख्य परिसराचे पावित्र्य व जैवविविधता टिकवण्यासाठी खाजगी वाहनांना विशिष्ट अंतरापर्यंतच प्रवेश दिला जाईल.तेथून पुढे पर्यावरण बसची सोय करण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणापासून पठारापर्यंतची बस सेवा मोफत असणार आहे.प्रत्येक ग्रुपला परिसराची माहिती पत्रिकाही देण्यात येणार आहे. एकीव वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे दृश्य पाहता येणार आहे,तसेच कुमुदिनी तलाव वॉच टॉवर वरून कास तलाव परिसराचे दर्शनही घेता येणार आहे.

३)प्लास्टिक बंदी: पठार परिसरात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व कचरा टाकण्यात सक्त मनाई असून कठोर सुरक्षा नियमावली लागू करण्यात आली आहे.

४) प्रवेश सुविधांचे दर: १२ वर्षावरील पर्यटक २०० रुपये, शालेय सहल-४० रुपये प्रतिविद्यार्थी, गाईड- १० जणांच्या ग्रुप साठी २००रुपये प्रतितास.

जैवविविधतेचा हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यभरातून हजारो पर्यटक सातारा शहराकडे वळत असतात. स्थानिक प्रशासन आणि वनविभागातर्फे पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली,असून निसर्ग प्रेमींनी या जागतिक वारशाचे सौंदर्य अनुभवताना नियमांचे पालन करण्याने गरजेचे आहे.

मंडपघळ ठरणार नवे आकर्षण: कास पठारासोबतच परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात येत आहे. यामध्ये मंडपघळ हे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. दऱ्या-खोऱ्यांचे नयनरम्य दृश्य,निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधतेमुळे मंडपघळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. दरम्यान कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करावे, फुलांमध्ये प्रवेश करू नये तसेच परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार गाव संवर्धन समितीने केले आहे.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *