सामाजिक

तळेगावातील नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा!


तळेगाव दाभाडे: येथील नामवंत आयकॉनिक सोसायटीमध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमांमध्ये सौ.केकाण यांनी सुंदर असा अभंग सादर केला.त्यांच्या सुमधुर अभंगाणे सर्व वातावरण प्रफुल्लित झाले.तसेच श्रीमती. नलावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सुंदर पोवाडा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीतील ज्येष्ठ सदस्य श्री. राधाकृष्ण जावळे व सौ. उज्वला जावळे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सोसायटीतील जेष्ठ महिला व अन्य सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सर्व महिलांना अल्पोहार देण्यात आला. सौ. पुनम निकम यांनी श्री व सौ.जावळे यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *