नायगाव येथे झालेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात तळेगावातील महिला व जेष्ठ नागरिक उत्साहात सहभागी
तळेगाव दाभाडे:भारतीय समाज सुधारक,शिक्षणतज्ञ कवियत्री,स्त्रीवादाची जननी तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्री जोतिबा फुले यांच्या यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी नायगाव (सातारा) येथे झालेल्या कार्यक्रमात तळेगावातील नामवंत आयकॉनिक सोसायटीतील जेष्ठ नागरिक व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ जयंतीनिमित्त नायगावमधील फुलेवाडा येथे आकर्षण सजावट व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या नायगाव येथील घरापासून दिंडीने या उत्सवाला सुरुवात झाली .
कार्यक्रमानंतर आयकॉनिक सोसायटीतील जेष्ठ नागरिक व महिला भगिनी यांनी एक अनोखी ऊर्जा व प्रेरणा याठिकाणी मिळाल्याचे सांगितले. तेथून सोसायटीमधील मंडळी तिरुपती बालाजी (केतकवले) व नारायणपूर दत्त मंदिर याठिकाणी भेट दिली.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गाडीचा खर्च तळेगावचे नगरसेव श्री. संदीक अण्णा शेळके यांनी केला. त्यांनी केलेल्या ह्या सहकार्यासाठी नम्रता आयकॉनिक सोसायटीतील सर्व महिला भगिनी व जेष्ठ नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त केले.

संपादक : पूनम निकम





