उद्योगमनोरंजन

विशाखापट्टम मध्ये तळेगावच्या OSK कराटे क्लबने द्वितीय क्रमांक पटकवला.


तळेगाव दाभाडे दि.10:विशाखापटनम येथे झालेल्या 28 व्या OMAA नॅशनल टूर्नामेंट मध्ये तळेगातील OSK कराटे क्लब अँड मार्शल आर्ट च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.26 ते 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेमध्ये 21 विद्यार्थी सहभागी झाले होते. चार दिवसीय झालेल्या ह्या स्पर्धेत काता व फाइट या दोन्ही कॅटेगरीमध्ये  11 गोल्ड, 6 सिल्वर व 18 ब्रॉन्झ मेडल मिळवून ऑल ओव्हर इंडिया मधून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.संपूर्ण तळेगावासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे.त्यांच्या ह्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक रवी वाघ (4th degree black belt) यांचे सर्व पालक व नागरिकांनाकडूनकौतुक व अभिनंदन होतं आहे.

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *