उद्योगताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षण

वडगांव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलला ए प्लस श्रेणी!


वडगांव मावळ :”गुणवत्तेचा मानबिंदू शाळा, आमचा अभिमान असा ध्यास उराशी बाळगून अहोरात्र मेहनत घेणारे शाळेच्या पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड, विभाग प्रमुख नीता शेटे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवीन नवघणे व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष सुधीर म्हाळस्कर व सर्व सदस्य या सर्वांचे सहकार्य तसेच गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, केंद्रप्रमुख निर्मला काळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे”असे मत प्राचार्य सतीश हाके  ( न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,वडगाव मावळ ) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनामार्फत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत झालेल्या मूल्यांकनात वडगाव मावळच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजला ए प्लस (A+) श्रेणी प्राप्त झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातील (A+) श्रेणी मिळालेल्या ४२९ शाळांमध्ये या शाळेचा समावेश झाला असल्याने शाळेचे विशेष कौतुक होत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शाळांच्या गुणवत्तेत मूल्यमापन मानके निश्चित करणे आणि शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हे एक महत्त्वाचे साधन आहे. या अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एक लाख दोन हजार ६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले होते. या मूल्यांकनामध्ये सण २०२५-२६ मध्ये १० हजार ७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड झाली होती. त्यापैकी १० हजार ६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले त्यापैकी संपूर्ण राज्यभरातून फक्त ४२९ शाळांना ए प्लस(A+) श्रेणी प्राप्त झाली. यामध्ये वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेचा समावेश आहे ए श्रेणी(A+) चालले शाळेच्या दर्शनी भागात किंवा शाळेच्या लेटरहेडवर नमूद करावा असा अभिमानास्पद आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे

शाळेचे प्राचार्य सतीश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सर्वोत्तम जाली असून, विविध परीक्षा,क्रीडा स्पर्धांमध्ये व विविध प्रकल्पांमध्ये शाळा यशस्वी ठरत आहे.महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेल्या मूल्यांकनातून शाळेला ए प्लस (A+) श्रेणी मिळाल्याने संपूर्ण राज्यभरात शाळेचे नाव उज्वल झाले आहे. व सर्व पालक आणि ग्रामस्थांकडून प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर अभिनंदन असा वर्षाव होत आहे.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *