उद्योगक्राईमताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

आयकॉनिक सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न!


तळेगाव दाभाडे: पराक्रमी योद्धा,कुशल प्रशासक,प्रजा रक्षक,स्वराज्य रक्षक, प्रौढ प्रतापी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी “शिवजयंती” उत्साहात संपन्न झाली.

यावेळी सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीतील क्लब हाऊस मध्ये संध्याकाळी ७ वाजता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. व महाराजांचा पाळणा सादर करण्यात आला. त्यानंतर “जय भवानी जय शिवाजी” या घोषणेने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

कार्यक्रमासाठी लहान मुलींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. महाराजांच्या जीवन कार्यावर कु.अंश कालेकर,कु. प्रणव नलावडे आणि कु.दंडवते ह्या मुलांनी अनुक्रमे भाषणे सादर केली. मुलांनी त्यांच्या तडफदार भाषण शैलीने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री.गणेश बोरुडे (सकाळ वर्तमानपत्र ) राधाकृष्ण जावळे, ॲड. श्री.विलासजी सोनवणे, श्री.नामदेव ननवरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये माऊली जेष्ठ नागरिक संघ, तसेच सोसायटीमधील श्री.चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष श्री. शंकर भोसले,सदस्य श्री.गणेश नलावडे, श्री.दत्ता माने, श्री. आदेश कालेकर, श्री.गोरख खापे,श्री.राम काळे, श्रीमती कालेकर,श्रीमती नलावडे, सौ.दीपा कालेकर, सौ.स्वाती खापे ,सौ.अश्विनी नलावडे, सौ.कांचन दुबे,सौ.शुभांगी काळे, सौ.सुजाता जावळे, सौ.पूजा काळे, सौ.रेवती काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.राधाकृष्ण जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. लहान मुलांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *