आईकोणिक सोसायटी मध्ये डॉ.भीमराव आंबेडकर महानिर्वाणदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.
तळेगाव दाभाडे दि.6: येथील आईकोणिक सोसायटीमध्ये 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 69 व्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संद्याकाळी 6 वाजता येथील क्लबहाऊस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माद्यमातून समानतेचा अधिकार प्राप्त करून देणारे महामानव डॉ. आंबेडकर यांच्या समाजकार्य व जीवनप्रावासाची थोडक्यात माहिती राधाकृष्ण जावळे ह्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमासाठी नागरिक व मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माऊली जेष्ठ नागरिक संघांचे सहकार्य मोलाचे लाभले.

संपादक : पूनम निकम





