पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात स्वागत.
तळेगावं दाभाडे दि. 10: येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आनंदात स्वागत करण्यात आले. रविवार दि. 8 रोजी नूतन संतोष भेगडे व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदक्षिणा सोहळ्याचे पूजन करण्यात आले. पुढे हि प्रदक्षिणा खडक मोहल्ला, भोई आळी, बाजारपेठ, राजेंद्र चौक, तेली समाज मंदिर, सुभाष चौक, शाळा चौक या मार्गाने मार्गक्रमण करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावा घेतला. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ह्यावेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानराज माउलींच्या सत्तेतून व हैबतबाबांच्याप्रेरणेतून सुरु झालेल्या या पुण्यपरंपरेला यंदा 729 वे वर्ष पूर्ण झाले आहे.

संपादक : पूनम निकम





