तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली!
तळेगाव दाभाडे दि.१५: भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे, नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विज्ञान,तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. कलाम यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे.आपल्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या आणि प्रेरणादायी विचारांच्या बळावर त्यांनी देशातील लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली.त्यांचे जीवन कार्य आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी डॉ.कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देत,त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श सर्वांनी आपल्या जीवनात जपावा असे आवाहन करण्यात आले.उपस्थित सर्वअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस सामूहिक पुष्पांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास कर अधिकारी कल्याणी लाडे,आस्थापन विभाग प्रमुख नेहा पाटील, विद्युत विभाग प्रमुख स्मिता म्हस्के, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, दत्तात्रय ढवळे, सुनील काळकुटे,भांडार विभाग समन्वयक रोहित भोसले, जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे,तसेच नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम तेजी यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : पूनम निकम





