पुणे जिल्हा पत्रकार संघटनांना नवे बळ ;उत्तर व दक्षिण पुणे कार्यकारिणीची घोषणा!
एस.एम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळ्यात पार पडली महत्त्वपूर्ण बैठक पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार!
लोणावळा: पत्रकारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी, त्यांच्यावरील अन्यायाचा तीव्र प्रतिकार करण्यासाठी आणि ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिक आक्रमक आणि सक्षम पावले उचलणार आहे,असा ठाम निर्धार परिषदेचे संस्थापक विश्वस्त एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न लोणावळा पत्रकार संघ व मावळ तालुका पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी लोणावळा येथे आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उत्तर पुणे,दक्षिण पुणे जिल्हा तसेच पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीत पत्रकारांसाठी विमा व आरोग्य संरक्षण, कल्याणकारी योजना, ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न तसेच डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) बदलत्या युगातील पत्रकारिते समोरील आव्हाने यावरील सखोल मंथन झाले. पत्रकारांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी खालील प्रमाणे:-
दक्षिण पुणे जिल्हा कार्यकारिणी:-
१) अध्यक्ष :- सूर्यकांत किंद्रे (भोर)
२) उपाध्यक्ष:- राजकुमार थोरात (इंदापूर),प्रकाश फाळके(पुरंदर )
३) सरचिटणीस:- जीवन शेंडकर (दौंड)
४) कोषाध्यक्ष:-विनोद मांझिरे (मुळशी)
५) जिल्हा प्रतोदपदी: बंडू दातीर (मुळशी)
६) परिषद प्रतिनिधी:-(फेरनियुक्ति):-एम.जी.शेलार
७) राज्य कार्यकारिणी सदस्य:- राजेंद्र गवळी, दत्तात्रय भोंगळे
उत्तर पुणे जिल्हा कार्यकारणी:-
१) अध्यक्ष:-संतोष वळसे पाटील,सचिन कांकरिया,हनुमंत देवकर
२) सरचिटणीस:- दत्ता भालेराव (खेड)
३) कोषाध्यक्ष:- संजय बारहाते (शिरूर)
४) जिल्हा निवडणूक प्रमुख:- रवी पाटील
शहर व विशेष नियुक्ती:-
१) पुणे महानगर अध्यक्ष:- प्रमोद गव्हाणे
२) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष:-सागर सूर्यवंशी
३) जिल्हा कायदेशीर सल्लागार:- ॲड.संजय पाटील(मावळ)
४) परिषद जिल्हा प्रतिनिधी:-विजय सुराणा (मावळ)
मान्यवरांची उपस्थिती:-
कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्था विश्वस्त शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशी, लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ आदाते यांच्यासह मावळ व कामशेत पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विजय सोनवणे, पुणे शहर समन्वयक मारुती बानेवार,महावीर जाधव,संतोष गोतावळे,सिद्धांत चौधरी,हनुमंत रामदासी, नरेश जिनवाल,अनिल वडघुले,प्रकाश जमाले,श्रीराम कुमठेकर,गणेश लालगुडे,महादेव वाघमारे, रेखा भेगडे,संतोष थिटे, मनोज गवळी, मनोज मोरे,सुभाष भांडे,मयूर सातपुते, रश्मी शिरसकर,सुनील मस्के,शकील बागवान, विद्या अडसुळे, पूनम निकम, सारिका लालगुडे, संजय अडसूळे, ॲड. प्रफुल्ल सोनवणे,बाबा तारे, संतोष महामुनी, पराग डिंगणकर ,जयराज सूर्यवंशी,गुरुनाथ नेमाने, पांडुरंग तिखे प्रज्ञा अबनावे,किसन भोसले आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार आमिन खान यांनी केले,तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष योगेश घोडके यांनी केले. मावळ तालुका पत्रकार परिषद संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक : पूनम निकम





