आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचे

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंची चहू बाजूंनी चमक!


जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडूंची चहुबाजूनी चमक!शुभ्रा गाडे, ज्ञानेश्वरी साबळे, तपस्या मते यांना सुवर्ण; चैतन्य फाटकला रोप्य,तर प्रीती दुडेला कांस्यपदक!

पवनानगर: आंतरशालेय जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय,राजगुरुनगर (खेड) येथे मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर अनेक पदके आपल्या नावावर केली.या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत शुभ्रा गाडे आणि ज्ञानेश्वरी साबळे यांनी आपापल्या वजन गटात दमदारी दमदार कामगिरीचे  प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले, तसेच चैतन्य फाटकने  रोप्य पदक आणि प्रीती दुडे हिने कांस्य पदक मिळून आपल्या संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.

तपस्या मते ठरली सर्वोत्कृष्ट भारोतोल्लक 

या स्पर्धेत तपस्या मते हिने आपल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच १९ वर्षाखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट भारोतोल्लक हा अत्यंत मानाचा किताबही आपल्या नावावर केला. तिच्या या देदीप्यमान कामगिरीची संपूर्ण स्पर्धेत विशेष नोंद घेण्यात आली, आणि उपस्थिततांकडून तिचे कौतुक झाले. तसेच स्पर्धेत विघ्नेश, आदेश, केतकी यांनीही अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले.

खेळाडूंच्या या यशामागे शिवदुर्ग फिटनेस मार्गदर्शक व प्रशिक्षक अशोक मते यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंचा नियमित सराव,अतोनात मेहनत,शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्तरावर आपली गुणवत्ता आणि वर्चस्व सिद्ध केले आहे.खेळाडूंच्या या उज्वल यशाबद्दल शिवदुर्ग फिटनेसवर सर्व स्तरातून अभिनंदन व आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहे.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *