एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत अर्शद संदेचे सुवर्ण यश!
तळेगाव दाभाडे: एनएमआयईटी महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्शद संदे याने आंतर महाविद्यालयीन एअर पेस्टल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७३ गुणांची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आणि विद्यालयाचे नाव उंचावले आहे.
अर्शदच्या या देदीप्यमान यशामागे महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश मस्के, संचालक डॉ. प्रमोद पाटील, विभाग प्रमुख डॉ. सागर जोशी तसेच क्रीडा संचालक राजेंद्र लांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्याला आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देत ह्या स्पर्धेत यश संपादन करता आले.
अर्शदच्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार आणि सचिव संतोष खांडगे यांनी अर्शद चे अभिनंदन करून त्याला पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अर्शदच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल संपूर्ण मावळ परिसरातून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक : पूनम निकम





