एक पाऊल पाणी बचतीसाठी
💧 एक पाऊल पाणी बचतीसाठी…! 💧
📢 महत्त्वाची सूचना
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, *उद्या ५ नोव्हेंबर,गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.*
त्यामुळे नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा व उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी जपून वापरा आणि पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी व्हा.
आजची बचत, उद्याची सुरक्षितता!
💧 पाणी वाचवा… जीवन वाचवा…! 💧
तळेगाव दाभाडे नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग

संपादक : पूनम निकम





