उद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

वडगाव मावळच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ पुरस्कार प्राप्त!


वडगाव मावळ दि.१५: वडगाव मावळ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार अमोल कसबेकर आणि सचिन गायकवाड यांना भारत सरकार तर्फे मानाचा ‘उत्कृष्ट सेवा पदक’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पोलीस दलातील प्रदीर्घ व शिस्तबद्ध सेवा, सचोटी, प्रखर कर्तव्यनिष्ठता आणि उल्लेखनीय योगदान याची दखल घेऊन केंद्र सरकारने या दोन्ही कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील या सर्वोच्च सन्मानाने पुरस्कृत केले आहे. यामुळे वडगाव मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

“पोलीस दलातील कर्तव्य अत्यंत आव्हानात्मक असतात अशा स्थितीतही नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देत, निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणे ही संपूर्ण क्षेत्रासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे” असे कौतुकास्पद वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांनी केले. ह्या विशेष पुरस्काराबद्दल पत्रकार विजय सुराणा यांच्या हस्ते अमोल कसबेकर व सचिन गायकवाड यांना शाल व श्रीफळ देऊन गौवरान्वित करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

भारत सरकारच्या या सन्मानामुळे कसबेकर व गायकवाड यांच्या सेवाभावाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.या यशामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अधिक जोमाने, समर्पण भावनेने आणि जिद्दीने देशसेवा करण्याची नवोत्तम प्रेरणा मिळणार आहे. दोन्ही पोलीस अंमलदारांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *