श्री विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पाठ सांगता संपन्न
तळेगाव दाभाडे: येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून अखंड सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पाठ वाचनाची सांगता संपन्न झाली. हा समारंभ ह .भ .प नथुराम महाराज जगताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
श्री विठ्ठल मंदिरात दररोज नियमितपणे ज्ञानेश्वरी पाठाचे वाचन करण्यात येत होते. ह .भ .प नथुराम महाराज जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अध्यात्मिक उपक्रमाला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या समारंभाचे आयोजन विठ्ठल मंदिराचे संस्थांचे विश्वस्त ह .भ. प बाळकृष्ण महाराज आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी माजी अध्यक्ष हरिदास वनारसे, सुनील शहाणे ,मुरलीधर ढेकणे, सीमा कुलकर्णी, शारदा मोरे, चारुलता औसरकर ,हर्षवर्धन आरडे, वासंती दाभाडे, नंदा पिंगळे,यांच्यासह नियमित ज्ञानेश्वरी वाचन करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : पूनम निकम




