प्लास्टिकचे दुष्परिणाम
कराड : कराड शहरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर पालिकेकडून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडून कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवले जात नसल्यामुळे शहरात प्लास्टिकबंदी मोहिमेचाच कचरा झाल्याचे दिसत आहे. शहरात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी व बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना, नागरिकांना पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत, त्यातून दुसऱ्या दिवशी घंटा गाड्यांत व शहरातील नाले, ओढे तसेच सर्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्याही पडत आहेत.
शहरातील काही पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या छोट्या मोठया विक्रेत्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पालिकेकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने दिसून येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी पडणाऱ्या कचऱ्यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्लास्टिकच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात नगरपालिका हद्दीत शंभरहून अधिक हॉटेल, चायनिज, वडापाव, विक्रेते, कापड दुकानदार, भांडी विक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पडत असलेल्या कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा परिणाम हा त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांवर होत आहे. त्यामुळे पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
प्रत्येक घराघरांमधून साधारणतः टन आणि रस्त्यावरील नाले, बाजारपेठेतून २ टन असा एकूण १६ टन ओला व सुका कचरा एकत्रित केला जातो. त्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे ७५ टक्के आहे.
कसे तयार करतात प्लास्टिक:
प्लास्टिक तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. प्लास्टिकमध्ये पॉलीइथेलिन, पॉलीव्हिनाइल क्लोराईड, पोलिस्टेरिन, बेंझिन, झायलिन या मुख्य रसायनांचा वापर प्लास्टिक तयार केला जातो.
प्लास्टिकचे दुष्परिणाम:
हवाप्रदूषण.
कॅन्सर.
किडनी, फुफ्फुसे निकामी होणे.
ब्रेन डॅमेज.
प्लास्टिकचा शोध:
प्लास्टिक प्रथम अलेक्झांडर पार्कस यांनी वर्ष १८६२ मध्ये जगासमोर आणले. सेल्युलॉज नावाच्या एका ऑगॅनिक मटेरियल पासून हे तयार केले. तेव्हा त्यास पार्को साईन या नावाने ओळखले जात होते.१९६० च्या सुमारास पहिली प्लास्टिकची कॅरीबॅग बाजारपेठेत आली. तर १९८० व त्यापुढील काळात प्लास्टिक कॅरीबॅग सर्वत्र वापरली जाऊ लागली.
सर्व नागरिकांनी आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करायचाच नाही, असे ठरवले पाहिजे. शिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा देखील पर्यावरणास व मनुष्याच्या आरोग्यास उत्तम आहे..
लेखक: डॉ. सुधीर कुंभार, कराड..

संपादक : पूनम निकम





