रोटरी सिटीतर्फे पतंग महोत्सव साजरा
तळेगाव दाभाडे: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व काळोखे पाईप्स अँड प्रिकास्ट इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा महापतंग उत्सव १५ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला. मावळ पंचक्रोशीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी सर्वांचे कौतुक केले.
आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आपल्या मनोगतात अवघ्या सात महिन्यात तब्बल ७० उपक्रम राबवून रोटरी सिटीने आदर्शवत कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, रोटरी सिटी चे संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष भगवान शिंदे,अभिनेत्री प्रांजली पवार, क्लब ॲडव्हायझर हरिश्चंद्र गडसिंग, नगरसेविका शैलजा काळोखे, ऋतुजा भागवत, ऋषिकेश कुलकर्णी, भालचंद्र लेले, सीआरपीएफचे इन्स्पेक्टर रामदास यशवंते, आदी मान्यवर उपस्थित होत.
येणाऱ्या पुढील काळात नगरपालिकेच्या माध्यमातून रोटरी सिटीच्या सहकार्याने विविध समाज हिताचे उपक्रम राबवण्याचा मनोदय नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजातील विविध घटकांपर्यंत सेवाभावी उपक्रम पोहोचविण्याचे कार्य रोटरी सिटीच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती संस्थापक विलास काळोखे व अध्यक्ष भगवान शिंदे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा महापतंग उत्सव तळेगाव शहरात पहिल्यांदाच झाल्याने विद्यार्थी,नागरिक, महिला तसेच सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन ते तीस फुटापर्यंत रंगबिरंगी व पशुपक्ष्यांच्या आकाराचे पतंग पुणे संस्थेच्या वतीने सादर करण्यात आले. श्रीकांत झेपे व सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिके यावेळी सादर केली.

संपादक : पूनम निकम





