आरोग्यउद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

पुणे पीपल्स बँक च्या अध्यक्षपदी बबनराव भेगडे यांची निवड


तळेगाव दाभाडे दि.१५: पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सहकार भूषण बबनराव बळवंत भेगडे यांची निवड झाली आहे.गुरुवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.भेगडे यांचे तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, १९९७ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पद,तर २००५ ते २००६ या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.राज्य बाजार समिती संघाच्या पुणे जिल्ह्यातील संचालकपदी महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक असोसिएशनच्या संचालकपदी तसेच पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *