ॲड.पु.वा परांजपे विद्यामंदिरचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे: “नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत शिक्षण घेत असलेला प्रत्येक विद्यार्थी अनेकविध क्षेत्रात आपले गुण कौशल्य विकसित करून समाजात नावलौकिकास पात्र व्हावा” अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष व मा.राज्यमंत्री श्री.संजय(बाळा)भेगडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. तळेगाव दाभाडे येथील ॲड .पु.वा परांजपे विद्या मंदिराचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि. १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.श्री प्रसाद पादीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. संमेलन प्रमुख सौ.रजनी बधाले यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले व विद्यालयातील विविध उपक्रम व प्रगतीचा आलेख मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला.
गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत,योग व ध्यानधारणा यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, हस्तकला दालन, रांगोळी प्रदर्शन,ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान दालन यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख व्याख्याते श्री.प्रदीप कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आदर्श जीवनशैलीचा संदेश देत विज्ञान – तंत्रज्ञानाच्या युगातही माणुसकीचे संस्कार जपण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट केले. तसेच या शाळेच्या हस्तलिखिताचे प्रकाशन श्री.सोनबा गोपाळे यांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थांना पारितोषिके बहाल करण्यात आली.
कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्री.नंदकुमार शेलार,सचिव श्री. संतोष खांडगे,खजिनदार श्री.राजेश म्हस्के,सहसचिव श्री. विनायक अभ्यंकर,शालेय समिती अध्यक्ष श्री.चंद्रकांत शेटे, संस्थेचे सल्लागार श्री.महेश भाई शहा,नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री.संतोष हरिभाऊ दाभाडे, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी,शिक्षक,माजी विद्यार्थी,पालक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दीप्ती बारमूख व सौ.प्रभा काळे यांनी केले.उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका सौ.रेखा भेगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

संपादक : पूनम निकम





