गो. नी. दांडेकर करंडक बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल पुन्हा बाजी मारली!
तळेगाव दाभाडे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कै.पै.मोहन महादेव काकडे स्मरणार्थ गो. नी. दांडेकर करंडक बालनाट्य या स्पर्धेचे आयोजन श्रीरंग कलानिकेतन (तळेगाव दाभाडे)येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये जैन इंग्लिश स्कूल ने सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला. स्पर्धेत विद्यार्थांनी आपल्या दमदार अभिनयाने परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली. नाटकातील विषयाची मांडणी, संवादफेक, नेपथ्य, संगीत सर्वच वाखाणण्याजोगे होते.
अभिनय, नेपथ्य, संगीत, वेशभूषा, रंगभूषा, लेखन आणि दिग्दर्शन विभागात विद्यार्थी व शिक्षक यांना वैयक्तिक प्रथम क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली.
अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुख्याध्यापिका व शिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि जिद्द यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातहि मुलांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे शाळेचे संचालक मंडळ, गावकरी व पालकवर्ग यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक : पूनम निकम





