पक्षी निरीक्षण व संवर्धन कार्यशाळा मार्गदर्शन
कराड: कराड कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या उपक्रमशील किणी हायस्कूल (किणी)येथे शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी आठ वाजता पक्षी निरीक्षण व संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा परिसरात झाडावर आजुबाजूला विविध पक्षी दिसत होते. त्या पक्षांची ओळख, त्यांचे पर्यावरणातील स्थान, अन्नसाखळीतील महत्त्व,पक्षी ओळखायचे कसे? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? त्यांची चोच, पंख,डोळे,पाय,शेपटी,तुरा, त्यांचे विविध रंग,नर मादी भेद, विविध पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या कला, हालचाल, लकबी, आणि खाद्य प्रकार तसेच पक्षांचे स्थलांतर का? कसे? केव्हा होते याची विविध उदाहरणे तसेच पक्षी अभ्यास ओळख व त्यांच्या शास्त्रीय नोंदी, ई बर्डींग, व इतर पक्षी ॲप च्या सहाय्याने ओळखायचे तंत्र डॉ. सुधीर कुंभार ( विज्ञान प्रसारक विद्यानगर सौदपूर) यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक श्री बि.डी मलगुंडे यांनी विद्यार्थ्यांना पक्षी व निसर्ग विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. डी. .डी चव्हाण व विद्यालयातील अध्यापक अध्यापिका उपस्थित होते.राष्ट्रीय हरित सेनेच्या श्री उत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात किनी गावाजवळील हत्ती माळाकडे जाण्याच्या रस्त्यावरील ओढ्यावर इ.आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण करण्यासाठी नेण्यात आले. तेथे पक्षांची नोंद व गणना कशी करायची असते याचे मार्गदर्शन करण्यात आले व दुर्बिणीतून पक्षी कसे पाहतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.दुर्बिणीतून पक्षी बघण्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. या क्षेत्रभेटीत सुमारे २२ प्रकारचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी नोंदविण्यात आले.हे सर्व पक्षी पाहत असताना विविध वनस्पतींची ओळख ,त्यांची वैशिष्ट्ये, कीटकांची वैशिष्ट्ये हे देखील दाखवण्यात आले.

संपादक : पूनम निकम





